Thursday, 28 September 2017

मैं भी तू भी

बेकरार में भी , बेकरार तू भी
इझहार में मैं भी , इझहार में तू भी
आजा जमाने से बगावत करले
इस कशमकश में मैं भी , इस कशमकश में तू भी ।

बेख़बर मैं भी, बेख़बर तू भी
इस मोड पर मैं भी , इस मोड पर तू भी
आजा आइने में भी दिदार करले
इक पल मैं भी, एक पल तू भी ।

इस काबिल मैं भी , इस काबिल तू भी
इक वफा में मैं भी , इक वफा में तू भी
बस , अब समदंर को भी काबू करले
इस कदर मैं भी , इस कदर तू भी ।

       @@@दस्तगीर@@@

Friday, 15 September 2017

⚽ फुटबॉल ⚽

आज बरेच वर्षानंतर ⚽ " फुटबॉल" ⚽खेळायचा योग आला , हा खेळ आपल्या  आयुष्याशी खूपच समरस आहे कमी वेळात तुम्हाला सर्वाना बरोबर घेऊन आक्रमण आणि बचाव दोन्हीं बाजू योग्य सभाळाव्या लागतात तर,  कधी गोलकीपर बनून सर्व संकट अडचणी अडवाव्या लागतात ,तर कधी त्यांना सोपा  पास द्यावा लागतो , तरच तुम्ही जिंकला .
शाळेत असताना क्रिकेट पेक्षा फुटबॉल खूपच आवडायचा
गोल कधीच करता आला नसला तरी पास चांगला करत होतो आज आयुष्यात हा पासच बऱ्यापैकी जमतोय फुटबॉल मुळेच .
शासनाने आज फुटबॉल खेळाच्या प्रचार आणि प्रसार साठी आज  शाळा मध्ये फुटबॉल खेळ खरळण्यास खास उपक्रम घेतला आणि मैदानावर  बॉल बघून राहावल नाही मोबाईल पडेल म्हणून दिलेल्या माझ्या विद्यार्थ्यांने हा नकळत  फोटो काढला .......
सातवी मध्ये असतांना , "अभिनव मंदिर कर्जत" ला आमचा वर्ग तुफान फुटबॉल प्रेमी होता क्रीडाशिक्षक
" श्री बडे सर " खेळाची तळमळ असणार व्यक्तिमत्त्व सराव भरपूर घ्यायचे , कर्जत म्हणजे एक hill station पेक्षा कमी नाही . भरपूर पाऊस हिरवंगार नटलेलं लाल मातीचे डोंगर ,
त्यावेळी शाळेत तास संपण्याची घंटा झाली की  , मैदानावर कधी जाऊ अस व्हायचं तुरूंगातून सुटका झाल्यासारखे कैदी सुटायचे .
मैदानावर डोक्यावर टोपी , गळ्यात शिट्टी असलेले सर समोरच असायचे
भलंमोठं मैदानावर , "फुटबॉल" किंवा " पाय " जो पर्यंत फुटत नाही तो पर्यंत कुणी थांबत नसे.
सरांकडून समझल की " खोपोली "  ला  आंतरविद्यालय फुटबॉल स्पर्धा आहेत आता संधी आली होती . 8 दिवस खूप  सराव केला .
Adv Hrishikesh Joshi ,  आमचा कॅप्टन होता  गडी पहिल्यापासून "  गबरु " गोंडस " पण खेळायचा अफलातून , Sampat Hadap आमचा हिरोच Milind   Kale अवलिया कधी काय करेल नेम नाही , Roshan Agaj वाऱयापेक्षा चपळ , Vinayak Rokade उत्तम , Mahesh Misal , Nilesh Patil Abhishek Zunjarrao आम्ही जेमतेम च  आमचे हे सर्व  आधारस्तंभ आणि मी  , रेल्वेने आम्ही सर्व जण खोपोली ला पोहोचलो खोपोली च्या मोठ्या ग्राउंड माञ आम्ही सर्वात वेगळे दिसत होतो , सर्व मस्त किट मध्ये  , खेळायच प्रॉपर किट आमच्या कडे नव्हतं बूट नव्हते , गार्ड नव्हते t shirt काहीच नाही सर्व थोडेसे नाराज झाले पण , सरांचा विश्वास आमचा आत्मविश्वास या मध्ये कुणा पेक्षा हि कमी नव्हतो .
शेवटी आम्ही सर्व tshirt काढून  खेळलो ,
"  सामना जिंकता जिंकता हरलो "  , सर्व  आलेली खेळाडू आमच्या खेळाडू वृत्तीला दाद देत होते शिक्षक टाळ्या वाजवत होते सामना हरलो , पण  याची खंत  कधीच नाही  राहिली , कारण आमच्यातला प्रत्येक जण आज आपल्या क्षेत्रात त्या  " फुटबॉल "च्या सामान्या प्रमाणे आज best च  करतोय कदाचित त्या ठिकाणी पोचला नसेल  पोहचणार नक्की हा आत्मविश्वास त्या मॅचने दिला ,पण त्यासाठी प्रयत्न पण नक्कीच पराकोटीचे करतोय
""'हे नक्की"""
#Miss
#u
#abhinav
⚽⚽ Football ⚽⚽
Dastgeersayyad.blogdpot.com

Saturday, 9 September 2017

सहयाद्री च्या कन्येने हिमालयाला झाकलं

सह्याद्री ची कन्या हिमालयाला झाकलं तू
" शहीद कर्नल संतोष महाडिक "   यांच्या वीरपत्नी
" स्वाती महाडिक"  या अत्यंत कठोर प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट पदी रुजू झाल्या अनेक शासकीय योजना घेऊन , दोन मुलं सांभाळत ,  आरामात जीवन जगल्या असत्या मात्र या वीर पत्नीने , पतीच्या अंत्यदर्शनाला पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची  जी शपथ घेतली आणि आज ती पूर्ण केली .
महाराष्ट्र नव्हे तर आज सम्पूर्ण भारतात  , आज एक आदर्श निर्माण केला .
आम्हाला सार्थ अभिमान आहे की या "  छत्रपती शिवाजी महाराजांच्या "  भूमीत जन्म घेतला शाहू , फुले , आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी आज आमच्या कडे आहे .
धर्म द्वेषाच्या काही कर्मठ रूढी , पाळताना महिलां च्या जुनाट परंपराना
वैचारिकतेला सणसणीत टोला लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या घटनेने  दिला
लेफ्टनंट स्वाती महाडिक  अनेक मुली , महिला न समोर एक खूप मोठा दीपस्तंभच  उभारला आहे . आज महिला आमच्या समान नाहीतर , निश्चितच पुढे गेल्या आहेत .

" असामान्य बलिदान  कर्नल संतोष महाडिक यांचं आणि असामान्य ईच्छा , शौर्य  लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं "  दोघांनाही
मानाचा मुजरा 👌👌👌

" दिल्ली चे ही तख्त राखतो , महाराष्ट्र माझा "
Dastgeersayyad.blogspot.com