Thursday, 31 August 2017

तुझ्या आठवणी चा जोर अजून कायम आहे

तुज्या आठवणीचा जोर अजून कायम  आहे
इथे पण तू , तिथे पण तू
भाव पण तू , देव पण तू
तुझ्या आठवणीचा जोर अजून कायम आहे ।।

या बेभान अथांग सागराचा  किनारा तू ,
किनाऱ्याच्या रेतीला हातात  सामवणारी तू ,
तुझ्या आठवणीचा जोर अजून कायम आहे ।।

या आसवांच्या धारेत आहेस तू ,
या नयनात भरून येणारी आस आहेस तू ,
तुझ्या आठवणी चा जोर अजून कायम आहे ।।

जवळ असतानाही ही तू , लांब असतानाही तू ,
एका क्षणात असतेस तू , दुसऱ्या क्षणात नसतेस तू ,
तुझ्या आठवणीचा जोर अजून कायम आहे ।।

प्रत्येक क्षणात बरोबर  तू , ह्रदयात घर करन बसलेली तू
रोज रात्रीला पडणार स्वप्न तू , अधुरे राहिलेलं तेच स्वप्न तू
तुझ्या आठवणी चा जोर अजून कायम आहे ।।
Dastgeersayyad.blogspot.com

Tuesday, 29 August 2017

पाऊस आणि ती

" पावसा सारखी ती "
"  कितीही आभाळ दाटल तरी न कोसळनारी ती
कधी मात्र सर्वस्व वाहून नेणारी , उध्वस्त करणारी ती "

" श्रावण सरी ती , अंगावर शहारा आणणारी एक वारर्याची झुळूक च ती ,
होती छत्री डोक्यावर तरी भिजलेली ती "

" अल्लड ती , नाजूक  हास्यात उडालेली एक लहरच ती
बेधुंद ती , स्वप्नात जगणारी एक मनमौजीच ती "

" वेंधळी ती , बालपनात रमणारी एक बालिका च  ती "
"सौन्दर्या ती , यौवणाची झालर ओढलेली एक परीच ती "

"वेडीच ती , विजेच्या आवजाने बिलगनारी ती "
" शब्दगधं ती , शब्दांची झालेली कविताच ती "

" स्वप्नाळू ती , एका क्षणात आयुष्य जगू पाहणारी  ती "
" दामिनी ती  , नात्यानं साठी स्वप्नांना सोडणारी ती .....

परत हा पाऊस येतो   , आणि त्या आठवणीने मला
भिजवून टाकते ती ,

"  कधी भिजतो मीही आता पावसात ,
बसून एकटा चहा चा घोट जातो जेव्हा घशात ,
मग मात्र आठवते ती ,
भिजत असेल कुठे तरी आठवणीत  ती

म्हणूनच पाऊस आला की आठवते ती
म्हणूनच पाऊस आला की आठवते ती

  ( किनीही वयक्तिक पोस्ट घेऊ नका , फोटो प्रतिमात्मक आहे , कॉपी पेस्ट केल्यावर नावासाहित कृपया )

Dastgeersayyad.blogspot.com

Thursday, 24 August 2017

कारण एकच दोस्तीकारण

" कारण एकच राजकारण " 

आज पर्यंत चा माझा सर्वात मोठा आणि सर्वात जास्त वैचारिकता जपणारा चर्चा करणारा हा ग्रुप , साधारण  वर्षा भरा पूर्वी या मध्ये , सामील होण्याची संधी मिळाली , 
            याचं ग्रुप च्या माध्यमातून एक मित्र भेटला
Facbook च्या आभासी दुनियेत ला एक  मित्र .
माझ्या गावाच्या शेजारच्याच गावातील  " पाटस " येथील ,  उद्योजक श्री संतोष टकले
ऑनलाईन बोलणे  वेगळं , प्रत्यक्षात लवकर ओळखने वेगळं   , पण अस झालं नाही .
आज दुपारी वेळ काढून भेटायला गेलो , आशीर्वाद ऑटोमोबाईल  समोर गेलो दुकानात गर्दी होती ,  आणि  मी  " संतोष टकले " आहेत का हे विचारण्या अगोदरच ,  आतून आवाज आला , "  या दस्तगीर भाई "
मी संतोष ला ओळ्खन्या अगोदरच माझी ओळख त्यांना पटली , आणि मी येणार आहे हे  त्यांना माहीत नव्हतं तरी देखील .
एक ते दीड तास आम्ही गप्पा मारल्या , आणि त्या देखील खूप जुन्या मित्रा सारख्या , अनेक कौटुंबिक , आर्थिक , वयक्तिक अडचणी ना यशस्वी तोंड देऊन , हा वर आलेला एक समवयस्क मित्र , त्याच्या डोळ्यातच  , त्याने काढलेले कष्ट , हरवलेलं आई वडिलांच छत्र , अडचणी , दिसत होत्या .
नोकरी सोडून , नवख्या व्यवसायात मध्ये येऊन केलेली दमदार कामगिरी आणि यशस्वी वाटचाल  , कोणत्याही पाठिंबया शिवाय खूप प्रेरणा देऊन गेली .आपण नेहमी स्वतःच्या दुखाना गोंजारत बसतो , पण समाजात आज अशी लोक आहेत की आभाळा एवढ्या संकटाना सुद्धा जुमानत नाहीत आणि पुढे चालत राहतात ....
म्हणजेच " संतोष टकले "
अत्यंत जिद्दी , कष्टाळू , प्रेमळ आणि त्याच बरोबर सामाजिक जाण असलेलं  बहुआयामी व्यक्तिमत्त्व
अजून खूप बोलायचं आहे बर का 👌👌
भावी वाटचालीस शुभेच्छा मित्रा
#thanks
#कारणएकचराजकारण

Thursday, 10 August 2017

आजची हिरकणी

मानवी समाजात  ' नातं ' या शब्दाला विषेश स्थान आहे या नात्याने इतका घट्ट पीळ घातला आहे की दिवसो दिवस हा अधिकच घट्ट होत चालला आहे ..... मला ही नाही सुटत ते नाही सोडत....... एक शिक्षक आणि विद्यार्थ्यां च नात ....
                           ग्रामीण भागातील मुलांचं शिक्षण हे खूपच अडचणी ना सामोरे जात होतं असत . शेतकरी वर्गातून आलेली ही मुलं , आर्थिक परिस्थिती बेताची , त्यामुळे पडणारा शिक्षनात खंड शाळा , शिक्षक मिळून हा
जगन्नाथा चा रथ ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत .
गेली 7 वर्ष शिक्षक भरती नाही , अनुदान नाही . फक्त रोज नवीन gr आणि रोज एक योजना .
       ( शिक्षणावर खर्च म्हणजे पांढरा हत्ती पोसणे )
अस जर प्रशासनाला वाटत असेल , तर कस असेल आपलं भवितव्य अहो शिक्षणावर खर्च म्हणजे भविष्याची गुंतवणूक आहे ....
  " स्वातंत्र दिवस आलाय ना 70 वा आपला तरी "
....  3 महिने शाळेचा ड्रेस नाही , वह्या नाहीत , जेवणाला नीट डबा नाही , बाप दारू पितो आई दुसरीकडे कामाला ... ती पोरगी शेण काढते ,  धारा काढतो , दूध डेअरी ला टाकतो ,  आणि गाडीला हात करून शाळेत येते स्वप्न घेऊन आशेनं त्या मास्तर कडे बघत असते त्या काळ्या आयुश्याच चित्र त्या काळ्या फळ्यावर ती चमकवतेय आज सुद्धा ही परिस्थिती आहे ....
पण तरी
ती पोरगी मात्र स्वप्न बघते.....  सामन्याच असामान्य स्वन ...
संध्याकाळी गेल्यावर आईला वीटभट्टी वर  विटा पण टाकते एक बल्ब आहे फक्त घरी , ना tv ना मोबाईल ना ,  रेडिओ ना गाणी ....
पण तिच्या बुद्धिमते ला तोड नाही किती ही अभ्यास द्या , किती ही विषयांचा , कार्यक्रमात नृत्या पासून , तर स्टेज वर भाषण फक्त ऐकतच राहावं अस .... कुठून आणते ही एवढी ऊर्जा प्रश्न पडतो .....
ही स्त्री जात म्हणजेच ऊर्जा आहे लहानपणा पासून या निर्मिती ने त्यांना दिलेला वर ....
मित्रानो आज अश्या असंख्य हिरकण्या आपल्या आसपास आहेत ...
आईला 6 वा मुलगा झाला म्हणून त्याला सभाळण्या साठी शाळा सोडणाऱ्या ,
मुलगा की मुलगी या स्पर्धेतून बाहेर आलेल्या ,
गर्भातून वाचलेल्या ,
बालविवाह तुन सुटलेल्या ,
वासनांध पशूंन पासून वाचलेल्या ...
लढत आहेत झगडत आहेत फक्त शिक्षणा साठी त्या भुकेल्या आहेत ,
बघा आपल्या आसपास भरपूर सापडतील ...अश्या हिरकण्या....
.... लावा थोडा हातभार .....
अभिमान वाटेल भविष्यात अस काहीतरी नक्कीच करतील .........
" खरंच आपल्या छोट्याश्या मदतीने , कुणाचं मोठं स्वप्न पूर्ण होईल " ... .......... या 15 ऑगस्ट पर्यंत बघा कुणी आपल्या आसपास निदान शाळेचा ड्रेस , किंवा शालेय साहित्या पासून वंचित तर नाही ना ....एवढ तरी करू शकतो आपण आपल्या 70 व्या  स्वातंत्र्य दिना पर्यंत....
#बेटिपढाओ
#बेटीबचाव
Sayyadsir.blogspot.com

Friday, 4 August 2017

50 वर्ष , पूर्ण शरद पवार राजकीय कारकीर्द

ज्येष्ठ नेते मा.श्री." शरदचंद्रजी पवार "  यांच्या प्रदीर्घ संसदीय कामगिरीबद्दल मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडला.
या प्रस्तावावर बोलताना सामाजिक, राजकीय आदी सर्व क्षेत्रावरील खेळपट्टयांवर खेळणारे एकमेव फलंदाज म्हणून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची राज्याला आणि देशाला ओळख आहे , गौरवोदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले..
" महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाताना शरद पवार राजकारणात येण्यापुर्वीचा , महाराष्ट्र आणि शरद पवार राजकारणात आल्यानंतरचा महाराष्ट्र अशीच या राज्याच्या इतिहासाची विभागणी होईल " , असे भावपुर्ण उदगार
जयंत पाटील यांनी काढले .
" कँन्सरसारखा दुर्धर आजार झाला असतानाही इच्छाशक्तीच्या जोरावर पवारसाहेबांनी त्यावर मात केली "  त्यामुळे शरद पवार म्हणजे यमाच्या दाराला कुलूप लावून परत आलेला नेता असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले

वय वर्ष -७७ वर्ष
साहेब या वयात ही जनतेप्रती असलेली नाळ व काम करण्याची इच्छाशक्ती या माणसाला काही स्वस्थ बसू देत नाही...जनतेचे प्रश्न सोडवण्यास सतत आग्रही व अग्रभागी असलेला खराखुरा जनतेतील लोकनेता

सत्तेच्या या सारीपाटावर एक घर चालणारा राजा कोणी का असेना.....
पण सरळ, तिरकी, आडवी, उभी चाल चालणारा वजीर एकच...... आदरणीय पवार  साहेब !!

पन्नास वर्षे आपण केवळ राजकारणच नव्हे तर शिक्षण, क्रीडा  शेती , सहकार , साहित्य-संस्कृती, समाजकारण आदीं क्षेत्राशी आपण व्यापून आहात. आपण नेते घडवणारे नेते आहात...आपले अभिनंदन...शुभेच्छा...!!

( मित्रांनो माझा राजकारणाशी काही संबंध नाही पण
" शरद पवार " हे व्यक्तिमत्त्व मनापासून आवडत म्हणून  .....)
Sayyadsirblogspot.com

Wednesday, 2 August 2017

पट्टी वाल्या बाई 😢😢

" नोकरी , कॉलेज , हायस्कूल , आणि आपली प्राथमिक शाळा अस जर क्रम लावला तर आपली प्राथमिक शाळा च खरी आपली जडणघडण करत असते .....
कदाचीत काळाच्या ओघात अनेक गोष्टी पडद्याआड , होतात पण प्राथमिक चे दिवस मात्र काल च्या प्रसंगा सारखेच उभे असतात ....
विद्या विकास मंदिर (महिला मंडळ , शाळा ) ता .कर्जत . जि रायगड
ही माझी सुरवाती ची शाळा वडील एस .टी . मध्ये असल्याने खूप फिरत शिक्षण झाले त्या मुळे कदाचित , खूप पाहायला मिळालं , मित्र , शेजारी , शिक्षक , पुस्तके भेटली ....
कोकणात ला पाऊस आणि कोकणातली प्रेमळ माणसे नाही विसरू शकत कधी ....
खूप प्रेमळ असतात पावसा सारखी पूर्ण भिजवून टाकतात ....
माझी शाळा ही त्यावेळी नवीनच सूरू झालेली , विनाअनुदानित तत्वां वर चालणारी , संस्थापक ,संचालक , मुख्याध्यापक , शिक्षक ,शिपाई सर्व महिलाच ......
या महिलांनी च घडवलं मला...
एका साधारण मुस्लिम कुटुंबातला मी , माझी आई तर त्यावेळी निम्मी हिंदी मराठी च मिश्रण करून बोलणारी मला
पाहिल्यांदा घेऊन गेली .....
माझ्या मुलावर लक्ष ठेवा बहोत मस्ती करता वो  मुख्याध्यापक बाई "आप कुछ फिकर मत करो भाभी "
बाईनी हे वाक्य 4 वर्षे खर ठरवलं ....
खूप मार खाल्ला बाईंचा अभ्यासात हुशार पण ही हुशारी अनेक ठिकाणी चालायची भांडण , दंगा , मस्ती , चिडवणे, हा आवडीचा छंद आपला प्रत्येकाला टोपणनाव ठेवायचो ..
त्यामुळे कुणीही कुणाला  चिडवल की पहिला मार मलाच ...
जिन्याच्या खाली मोठ्या बाई च ऑफीच माझा वर्ग सर्वात वर
जिन्याचा आवाज झाला की बाई ओरडायच्या ..
"दस्तगीर ऑफिस मध्ये ये धर अंगठे"  .... कदाचित बाईना माझ्या पायाची चाहूल ओळखीची झाली होती ... अस वाटायचं ....
सुट्टी चे दिवस सोडून निम्मे दिवस मी मॅडमच्या ऑफिस मध्ये अंगठे धरलेला च असायचो .... अभ्यासात प्रगती जरी असली तरी बाई नि मला दया नाही दाखवली शेवटी मी ही तसाच डाकू  च .....
अभ्यासाचा पाया आज पर्यंत पक्का राहिला आणि ही इमारत टिकली बाई न मुळेच
बाईनी मात्र आईला कधी सांगितले नाही पोराला सुधारावा बाईनी तो प्रण स्वतःच घेतलेला होता .....
सांस्कृतिक कार्यक्रम , भाषण , आपलं जीव की प्राण
एकवर्षं ही मी स्टेजवर नाही असं झालं नाही ...
मी हाय कोळी 4 थ खूप सराव घेतला बाईनी
आणि गाणं ही खूपच छान बसलेलं ..रोशन , गणेश , मिलिंदआणि अजून 4 जण  दुसऱ्या बाजूला मुली असा आमचा ग्रुप त्यावेळी खूप गर्दी असायची पाहायला ...
गाणं सुरू झालं 2 कडवी झाली आणि तिसरया कडव्याच्या
चल जाऊ बाजारी या कडव्याला माझी लुंगी कधी सुटली मला कळलं च नाही समोर तर प्रेक्षकांचा हशाच पिकला बाई ओरडून " दस्तगीर अरे इकडे ये " म्हणत होत्या पण मला भानच नाही शेवटी माझ्या जोडीला असनाऱ्या मुलीने सांगितले " अरे वेड्या , तुझी लुंगी सुटली रे " मग कुठं भानावर परत साईडला जाऊन लुंगी घातली बाईनी आणि डान्स पूर्ण केला ".
नुकताच गेट टू गेदर ला गेलो होतो कर्जत ला शाळेत .....हाच किस्सा सांगत होतो सगळ्या बाई आमच्या हसत होत्या , रडत होत्या ,
आज मी शिक्षक झालो जे काही हे केवळ या महिला मंडळातल्या या आमच्या बायांन मुळे , आमच्या पट्टीवाल्या बाई केळकर बाई आल्या नव्हत्या फोनवर बोलल्या वयस्कर आहेत आता खूप
शिपाई बाई भेटल्या सर्व जणी रडल्या , आमच्या साठी खूप छान संगीताचा कार्यक्रम जेवण ..आयोजन केलं होतं
गणेश ,मिलिंद , महेश, रोशन , मनीष सगळे भेटले .....अनेक चेहरे ओळखायला मला वेळ लागला पण , तू दस्तगीर ना मला मात्र पाहताच क्षणी सगळे ओळखत होते कस काय ....
बाई जातांनी ही पाणवल्या डोळ्यांनी म्हणत होत्या ...
दस्तगीर खूप मार खाल्लास रे ....खूप मोठा हो प्रगती कर ...आणि नेहमी ये.....
आज त्या जुन्या इमारती च्या जागी ...मोठी इमारत झाली
मुलं आता टाय घालून येतात .... खूप फिरलो शाळेत सर्व बघत होतो आमचे जूने फोटो लावले होते फलकावर .... एका फोटोत "  मी स्टेज वर होतो ....
प्रेक्षकांन मध्ये बसलेली आई दिसली ...
मोबाईल मध्ये फोटो घेतला ....
चटकन एक डोळ्यातुन एक थेंब पडला ......आणि मग निघालो  शाळेकडे बघत...... .. .  स्वतः ला शोधत

( फोटो गाण्याच्या नंतर काढला आई ने जबरदस्ती ने , कारण ...नाही सांगणार😢😢😂😂😂😂 )
Sayyadsir.blogspot.com