Wednesday, 2 August 2017

पट्टी वाल्या बाई 😢😢

" नोकरी , कॉलेज , हायस्कूल , आणि आपली प्राथमिक शाळा अस जर क्रम लावला तर आपली प्राथमिक शाळा च खरी आपली जडणघडण करत असते .....
कदाचीत काळाच्या ओघात अनेक गोष्टी पडद्याआड , होतात पण प्राथमिक चे दिवस मात्र काल च्या प्रसंगा सारखेच उभे असतात ....
विद्या विकास मंदिर (महिला मंडळ , शाळा ) ता .कर्जत . जि रायगड
ही माझी सुरवाती ची शाळा वडील एस .टी . मध्ये असल्याने खूप फिरत शिक्षण झाले त्या मुळे कदाचित , खूप पाहायला मिळालं , मित्र , शेजारी , शिक्षक , पुस्तके भेटली ....
कोकणात ला पाऊस आणि कोकणातली प्रेमळ माणसे नाही विसरू शकत कधी ....
खूप प्रेमळ असतात पावसा सारखी पूर्ण भिजवून टाकतात ....
माझी शाळा ही त्यावेळी नवीनच सूरू झालेली , विनाअनुदानित तत्वां वर चालणारी , संस्थापक ,संचालक , मुख्याध्यापक , शिक्षक ,शिपाई सर्व महिलाच ......
या महिलांनी च घडवलं मला...
एका साधारण मुस्लिम कुटुंबातला मी , माझी आई तर त्यावेळी निम्मी हिंदी मराठी च मिश्रण करून बोलणारी मला
पाहिल्यांदा घेऊन गेली .....
माझ्या मुलावर लक्ष ठेवा बहोत मस्ती करता वो  मुख्याध्यापक बाई "आप कुछ फिकर मत करो भाभी "
बाईनी हे वाक्य 4 वर्षे खर ठरवलं ....
खूप मार खाल्ला बाईंचा अभ्यासात हुशार पण ही हुशारी अनेक ठिकाणी चालायची भांडण , दंगा , मस्ती , चिडवणे, हा आवडीचा छंद आपला प्रत्येकाला टोपणनाव ठेवायचो ..
त्यामुळे कुणीही कुणाला  चिडवल की पहिला मार मलाच ...
जिन्याच्या खाली मोठ्या बाई च ऑफीच माझा वर्ग सर्वात वर
जिन्याचा आवाज झाला की बाई ओरडायच्या ..
"दस्तगीर ऑफिस मध्ये ये धर अंगठे"  .... कदाचित बाईना माझ्या पायाची चाहूल ओळखीची झाली होती ... अस वाटायचं ....
सुट्टी चे दिवस सोडून निम्मे दिवस मी मॅडमच्या ऑफिस मध्ये अंगठे धरलेला च असायचो .... अभ्यासात प्रगती जरी असली तरी बाई नि मला दया नाही दाखवली शेवटी मी ही तसाच डाकू  च .....
अभ्यासाचा पाया आज पर्यंत पक्का राहिला आणि ही इमारत टिकली बाई न मुळेच
बाईनी मात्र आईला कधी सांगितले नाही पोराला सुधारावा बाईनी तो प्रण स्वतःच घेतलेला होता .....
सांस्कृतिक कार्यक्रम , भाषण , आपलं जीव की प्राण
एकवर्षं ही मी स्टेजवर नाही असं झालं नाही ...
मी हाय कोळी 4 थ खूप सराव घेतला बाईनी
आणि गाणं ही खूपच छान बसलेलं ..रोशन , गणेश , मिलिंदआणि अजून 4 जण  दुसऱ्या बाजूला मुली असा आमचा ग्रुप त्यावेळी खूप गर्दी असायची पाहायला ...
गाणं सुरू झालं 2 कडवी झाली आणि तिसरया कडव्याच्या
चल जाऊ बाजारी या कडव्याला माझी लुंगी कधी सुटली मला कळलं च नाही समोर तर प्रेक्षकांचा हशाच पिकला बाई ओरडून " दस्तगीर अरे इकडे ये " म्हणत होत्या पण मला भानच नाही शेवटी माझ्या जोडीला असनाऱ्या मुलीने सांगितले " अरे वेड्या , तुझी लुंगी सुटली रे " मग कुठं भानावर परत साईडला जाऊन लुंगी घातली बाईनी आणि डान्स पूर्ण केला ".
नुकताच गेट टू गेदर ला गेलो होतो कर्जत ला शाळेत .....हाच किस्सा सांगत होतो सगळ्या बाई आमच्या हसत होत्या , रडत होत्या ,
आज मी शिक्षक झालो जे काही हे केवळ या महिला मंडळातल्या या आमच्या बायांन मुळे , आमच्या पट्टीवाल्या बाई केळकर बाई आल्या नव्हत्या फोनवर बोलल्या वयस्कर आहेत आता खूप
शिपाई बाई भेटल्या सर्व जणी रडल्या , आमच्या साठी खूप छान संगीताचा कार्यक्रम जेवण ..आयोजन केलं होतं
गणेश ,मिलिंद , महेश, रोशन , मनीष सगळे भेटले .....अनेक चेहरे ओळखायला मला वेळ लागला पण , तू दस्तगीर ना मला मात्र पाहताच क्षणी सगळे ओळखत होते कस काय ....
बाई जातांनी ही पाणवल्या डोळ्यांनी म्हणत होत्या ...
दस्तगीर खूप मार खाल्लास रे ....खूप मोठा हो प्रगती कर ...आणि नेहमी ये.....
आज त्या जुन्या इमारती च्या जागी ...मोठी इमारत झाली
मुलं आता टाय घालून येतात .... खूप फिरलो शाळेत सर्व बघत होतो आमचे जूने फोटो लावले होते फलकावर .... एका फोटोत "  मी स्टेज वर होतो ....
प्रेक्षकांन मध्ये बसलेली आई दिसली ...
मोबाईल मध्ये फोटो घेतला ....
चटकन एक डोळ्यातुन एक थेंब पडला ......आणि मग निघालो  शाळेकडे बघत...... .. .  स्वतः ला शोधत

( फोटो गाण्याच्या नंतर काढला आई ने जबरदस्ती ने , कारण ...नाही सांगणार😢😢😂😂😂😂 )
Sayyadsir.blogspot.com

No comments:

Post a Comment