तुज्या आठवणीचा जोर अजून कायम आहे
इथे पण तू , तिथे पण तू
भाव पण तू , देव पण तू
तुझ्या आठवणीचा जोर अजून कायम आहे ।।
या बेभान अथांग सागराचा किनारा तू ,
किनाऱ्याच्या रेतीला हातात सामवणारी तू ,
तुझ्या आठवणीचा जोर अजून कायम आहे ।।
या आसवांच्या धारेत आहेस तू ,
या नयनात भरून येणारी आस आहेस तू ,
तुझ्या आठवणी चा जोर अजून कायम आहे ।।
जवळ असतानाही ही तू , लांब असतानाही तू ,
एका क्षणात असतेस तू , दुसऱ्या क्षणात नसतेस तू ,
तुझ्या आठवणीचा जोर अजून कायम आहे ।।
प्रत्येक क्षणात बरोबर तू , ह्रदयात घर करन बसलेली तू
रोज रात्रीला पडणार स्वप्न तू , अधुरे राहिलेलं तेच स्वप्न तू
तुझ्या आठवणी चा जोर अजून कायम आहे ।।
Dastgeersayyad.blogspot.com
No comments:
Post a Comment