Friday, 8 June 2018

रोज सकाळी लवकरच निघतो घरातून  गजर नाही लावत पण " साखरझोप आणि  रम्य पहाट " यांच्या लढाईत पहाट जिंकते आणि मला जाग करते  दरवाजा उघडला की बाहेरच्या वसरीत आराम खुर्चीवर बसलेली आमची मांजर ही क्षणात जागी होते , पायात घुटमळत ती ही जाते बाहेर , तयार होऊन बाहेर पडलो काळोख असतो कुठेतरी तांबडं पडायची सुरुवात झालेली असते , वाऱ्याचा एक बेधुंद शहारा अंगाला स्पर्श करतो आणि रात्रीचा आळस प्रसन्न मुद्रा घेत बाहेर ढकलून देतो .
              पावलं झपझप सुरू झाली , रस्त्यावर आलो की सगळी निरव शांततेत , पक्ष्यांचा जोरात आंनदोउत्सव सुरू असतो , दिवसाच्या संगीत मैफली पेक्षा हा अधिक सुरात वाटतो , घर झोपलेली असतात . रात्रीचे दिवे अजून ही चालूच असतात कुणीतरी माऊली झाडू घेऊन भलं मोठं अंगण झाडत असते तुळशीच्या वृंदावनात अगरबत्तीचा सुगंध दरवळत असतो सूर्यदेव ही अजून घरातच असतात .
      तो पर्यंत चौक ही उठायच्या तयारीत असतो प्रसन्न मुद्रेत " छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा " पहाटेच्या फिकट अंधारात नवचैतन्य देतो , रोज पुतळ्याकडे  बघत महाराजांच व्यक्तिमत्त्व , पराक्रमी देहबोली समोर उभी राहते , चहावाल्याची अजून सुरवात व्हायची असते दूध तापत असतं , पेपर वाला सायकल दामट असतो जशी काय जगाची खबर जग उठायच्या आत पोचवायची घाई असते त्याला .
        तिथुन पुढे प्रवास रस्त्यावर येतो , पीर साहेबांची दर्गा ,रस्त्यानेच नमस्कार होतो फुलं दिसतात मजार वर आणि पावलं सुरू होतात , रस्त्याला आता गर्दी असते भले पहाटे अनेक जण माझ्या आधी हजर असतात . आमची पिढी कानाला हेडफोन पायात शूज जोरात असते   आणि आमची जूनी पिढी ही असते , रोजचेच टोळके असतात काही मित्र वयाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहेत तरी हसत , बोलत , मस्करीत चालत असतात .
       आजीला घेऊन फिरायला आलेले आजोबा बॅटरी घेऊन पुढे आणि बळजबरीने चालणारी आज्जी मागेच असते काही शरीर आणि व्यायाम प्रेमी आमचे प्रेरणास्थान कित्येक वर्षांपासून तिथेच भेटतात माझ्याकडे  तिरक्या नजरेने हसत हसतात  , पलीकडे महादेव मंदिरात सुंदर गजर चालू असतो . घटनांद ऐकू येत असतो .
        गेली कित्येक वर्षे ही पहाट झोपुच देत नाही , रोज तांबड्या आकाशाची नवलाई घेईन जाते बरोबर , भला मोठा रस्त्याचा उतार संपतो , पावलं आता वेगवान होतात अंगातला गारवा जाऊन शरीर घामाच्या धाराना जवळ करत असत बेभान वाहन रस्त्यावर पळत असतात साधारण अडीच किलोमीटर अंतर पार झालेलं असत आणि  परतीचा प्रवास सुरू होतो .
         परतीच्या वाटेवर घराकडून कामाला निघालेले चाकरमानी गाड्यावर दिसू लागतात रेल्वे च्या घाईत , अंधार जाऊन तांबडं उजेडात गाव नाहून निघालेलं असतं अजूनही काही शहरीकरण पोचलं नाही तेच सुखावून जात. गाव आता जाग झालेलं असत दुकान थाटलेली असतात चौकात पांढऱ्या रंगातले अनेकजण वर्तमानपत्रावर तुटुन पडलेली  असतात , हॉटेलात घमघमात सुटलेला असतो .घर जागी झालेली असतात .
         जशी गर्दी वाढायला लागते , तसा मी मात्र एकटा पडत असतो . घर जवळ येत पहाटेच्या  बेधुंदीत भेटलेलो  मी आता परत भेटत नाही .........
✍ दस्तगीर सय्यद
 ( आयुष्याच्या डायरीतून )  ९/६/१८
Dastgeersayyadblogspot.com

Monday, 2 April 2018

बंगाली बाबा

बऱ्याच दिवसानंतर या रविवारी पुण्याला चाललो होतो , नेहमी प्रमाणे आपली सकाळीची ८ .४० ची दौंड बारामती पूणे  पेसेंजर ने पण  सकाळी उठायला उशीर झालाच , गाडी सापडते का नाही या विचारात निघालो केडगाव स्टेशन ला गाडी पार्किंग ला लावली तिकीट काढून , प्लॅटफॉर्म ला गेलो  , तोच गाडी निघाली पळत सुटलो ,  गाडी धरली आणि सुटकेचा श्वास टाकला .
             नेहमी प्रमाणे जागा करत विंडो सीट ला बसलो फॅन चालू होता , डोळे बंद केले जरा निवांत झालो डोळे उघडले समोर एक चित्र भल मोठ स्टिकर  बघितलं ...

" रेहमत तेरी , मेहनत मेरी , हिम्मत हमारी , किसमत तुम्हारी "
असली चमत्कार पेहली बार ,घरबैठे फोन पर 11 घनटे में 101% लाभ

1. मनचाहा प्यार
2 . प्रेम विवाह
3. वशीकरण
4. गृहक्लेश
5. सास से छुटकारा
6 .पती को काबू में लाना
7. बंदिश बंधन खोलना
8. कोख में बाधा
9. करणी
10. मूठकरनी
11. रुठो को मनाना
दुःखी और परेशान भाई बेहनो के लिए भरोसेमंद ठिकाणा
*वशीकरण और करणी स्पेशालिटी*
*बाबा  बंगाली *
( बुजूर्गो से मिला हुआ वरदान पल भर मे समाधान )
   😂😂😂😂😂😂😂
तुरंत  सम्पर्क करे ........

.... कालच  रात्री दररोज या गाडी ने पुण्याला ये जा करनारा मित्र भेटला ,
म्हणाला , " मरता मरता वाचलो "  , रेल्वेचा ब्रेकच  नाही लागला ,
गाडी थांबली नाही स्टेशन वर  ,  गाडी ने अचानक ट्रॅक बदलला गाडीने हेलकावे घेतले प्रचंड गोंधळ झाला सुदैवाने वाचले सगळे .....  मनात म्हणालो

( बाबा बंगालीची कृपा😉😉😉😉 )

प्रेम भांग

" #प्रेम_भंग_"
असा काही विषय नसतोच , तस कधी होत ही नाही , एकदा झालं की आयुष्यभर साथ असणारी भावना आहे . ती व्यक्ती असली काय नसली काय प्रेम नाही तुटत आणि जे  तुटत ते प्रेम वैगेरे नसतंच असलं तर आकर्षण होत . अस समजावं .
         हल्ली तर  सारखच कुणीतरी भेटतय ( ब्रेक अप ) गोंडस नाव देऊन  . असं काही होतं असेल तर त्या भावनेला प्रेम नाव देणं मुळात हेच चुकीचं आहे . ब्रेक अप च दुःख काय ब्रेक अप पार्टी काय ?
         अगोदर प्रेम समजून बघा , जगून तर बघा , करून तर बघा . आयुष्य कमी पडत . जग सोडताना , सुद्धा  प्रेम नाही सुटत .असली वर्ष दोन वर्ष चालणारी प्रेम ह्यांची  आणि मग  " प्रेम भंग "  असलं नाही प्रेमाच्या व्याख्यात बसतं मित्रांनो .बॉण्ड नसतो लिहलेला ना ती व्यक्ती भेटावंच असा .
आयुष्य जगतात लोक कधी ही न भेटलेल्या व्यक्ती च्या प्रेमात . अगोदर  प्रेम करून बघ मग ते जगून बघ बघ मग  आयुष्य काय असतं ते 👍👍
✍✍@ दस्तगीर सय्यद@

जुदाई वाला प्यार भी अपनाही मजा देता है .......
सजदों में गुजार दू सारी जिंदगी दिवाना केहता है !!

टीप :- ( आज सकाळीच भेटला होता एक " प्रेम भंगा " आला वठणीवर )😂😂😂😂😂
Please visit my blog
Dastgeersayyadblogspot.com.

Wednesday, 14 March 2018

मृत्यूनंजय

"तुमचं आयुष्य केवळ दोन वर्ष उरलं आहे," असं त्यांना डॉक्टरांनी म्हटलं त्यावेळी त्यांचं वय होतं २१ वर्षं. पण याच मृत्यूला ५५ वर्षे त्यांनी झुलवत ठेवलं. अनेकदा त्यांच्यात सलामी झडली.
मृत्यूला त्यांनी हरवलं देखील पण अखेर त्यालाही त्यांनी आज अकस्मात कवेत घेतले.
महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हातातून पारा निसटावा इतक्या अलगदपणे निवर्तले.

८ जानेवारी १९४२ ला  इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव.
संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई-बाबांकडून मिळालं. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड. विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत होते, म्हणून ते या विषयांकडे वळले.

ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. याच ठिकाणी त्यांची ओळख आपली भावी पत्नी जेन यांच्याशी झाली. जेन या आधुनिक भाषाविज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. न्यू इअर पार्टीमध्ये त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झालं. पुढे जाऊन त्यांना मोटार न्यूरॉन डिसीज आहे हे कळलं. या आजारामुळे हळुहळू आपलं शरीर पक्षाघातानं ग्रस्त होईल असं त्यांना समजलं. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला या असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले. हॉकिंग यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी हॉकिंग यांना हातात काठी घेऊन चालावं लागलं होतं.

मोटार न्यूरॉन डिसीजनं त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला होता, पण त्यांचं मन त्यांच्या पूर्ण नियंत्रणात होतं. आपल्या शारीरिक मर्यादांवर विजय मिळवून ते पुढं चालत राहिले. हातांमधली शक्ती जशी क्षीण होऊ लागली तसं ते किचकट गणितं आपल्या मनातच सोडवू लागले. गणिताची प्रमेयं ते आपल्या मनातच रचत असत. त्यांच्या या सवयीमुळेच स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केली असं त्यांचे सहकारी सांगतात. आपल्या कमकुवत स्थानांनाच त्यांनी आपल्या शक्तिस्थानांमध्ये परावर्तित केलं.

विश्वाची निर्मिती ही बिग बॅंगपासून झाली आहे असा सिद्धांत १९४० मध्ये मांडण्यात आला होता. पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी यावर अभ्यास केला. विश्वाच्या निर्मितीला सुरुवात बिग बॅंगपासून सुरुवात झाली असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अनेकांनी बिग बॅंग थेअरीला मान्यता दिली. त्यांना असं जाणवलं की, कृष्णविवराचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपल्याला अनेक रहस्यांचा शोध लावता येईल.

क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला. विज्ञानातील दोन वेगवेगळे सिद्धांत एकत्र करणं हे महाकठिण काम होतं. पण त्यांनी ते नेटानं सुरू ठेवलं. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलं की कृष्णविवरं चमकू शकतात. या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन म्हटलं जातं.

वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं. न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते. एव्हाना हॉकिंग यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवली होती, पण त्यांची प्रकृती खूप खालवत चालली होती. हालचाल करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा वापर सुरू केला.

वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांना न्यूमोनिया झाला. हॉकिंग यांना जिनेव्हातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा आवाज गमवाल याची कल्पना डॉक्टरांनी त्यांनी दिली. पण त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीनं ते अत्यावश्यक होतं. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपला आवाज गमवावा लागला. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक खास उपकरण तयार केलं. संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले होते. त्याआधारे ते बोलूही लागले.

१९८८ साली हॉकिंग यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम ( काळाचा संक्षिप्त इतिहास) हे पुस्तक लिहिलं. आपण केलेल्या अभ्यासाचा उपयोग सामान्य वाचकाला व्हावा असं वाटून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. विज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम'ची गणना होते. जेन आणि स्टीफन यांना तीन मुलं झाली. २५ वर्षं संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसनसोबत लग्न केलं. त्यांचं लग्न ११ वर्षं टिकलं त्यानंतर ते वेगळे झाले.

१९९९ मध्ये स्टीफन हॉकिंग यांचं नाव घराघरात पोहोचलं. याचं कारण म्हणजे एका प्रसिद्ध अॅनिमेशन सीरिजमध्ये त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं. गंमत म्हणजे आपल्यावर आधारित असलेलं हे पात्र हॉकिंग यांना खूप आवडलं. त्यानंतर त्यांच्यावर आलेल्या 'स्टीफन हॉकिंग्स युनिव्हर्स'मुळे ते आणखी लोकप्रिय झाले. सामान्य वाचकांसाठी त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. २००९  मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी ते ६७ वर्षांचे होते. पण यापुढे देखील आपण काम करत राहू असं ते म्हणाले. केंब्रिजमध्येच ते दुसऱ्या पदावर रुजू झाले. संशोधन आणि अध्यापनाचं कार्य ते अखेरपर्यंत करत होते.

दरम्यान हॉकिंग यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर आपलं काम सुरूचं ठेवलं. आपल्या 'द ग्रॅंड डिजाइन' या पुस्तकात त्यांनी म्हटलं होतं, "फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात. त्यामुळे या विश्वाचं गूढ उकलण्यासाठी केवळ एकच 'थेअरी ऑफ एव्हरीथिंग' लागू होईल असं म्हणता येणार नाही." म्हणजे गेली तीन दशकं त्यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले, 'अशी एकच थेअरी सापडणं हे कठीण काम आहे.'

२०१४ मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित 'थेअरी ऑफ एव्हरीथिंग' हा चित्रपट आला. त्यांची पहिली पत्नी जेन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं, त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती. केंब्रिज विद्यापीठानं त्यांचा शोधनिबंध विद्यापीठाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी जेंव्हा खुला केला तेंव्हा तो शोधनिबंध तब्बल २० लाख जणांनी पाहिला. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची आपल्याला कल्पना येऊ शकते.

आपल्या दुर्धर आजारांवर मात करणारे स्टीफन हॉकिंग अत्यंत आनंदी राहत. एकदा एका पत्रकाराने त्यांना यावर विचारलं तेंव्हा त्यांनी मी आयुष्याचा आस्वाद घेतो असं उत्तर दिलं. माझ्या आवडी निवडी आणि जगण्याच्या व्याख्या मला आनंदी ठेवतात अशी पुस्ती त्यांनी जोडली. पत्रकाराने पुन्हा पृच्छा केली - 'आपण एक महान भौतिकशास्त्रज्ञ म्हणून विश्वविख्यात आहात मग तुमच्या अशा कोणत्या आवडी निवडी आहेत की ते ऐकताच लोक हैराण होतील ?'
हॉकिंग उत्तरले - 'मला सर्व शैलीतलं संगीत आवडतं. पॉप, क्लासिकल, ऑपेरा सगळं ऐकतो मी ! इतकंच नव्हे तर माझा मुलगा टिम याच्या सोबत फॉर्म्युला वन कारच्या रेसिंगची मजाही मी घेतो.' हॉकिंगनी दिलेलं उत्तर ऐकून पत्रकार तोंडात बोटं घालायचा राहिला होता !                

लोकांसाठी काही संदेश द्याल का असं विचारलं की ते म्हणायचे, 
'अधिक महत्वाचीच कामं करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत.'
'माझ्याकडं इतकं काही आहे की ज्यावर मला काम करायचे आहे, त्यामुळे वेळ वाया घालवण्याविषयी मला चीड आहे.'
'तुम्हाला आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी तुम्ही नेहमी काही न काही करू शकता आणि सफल होऊ शकता.'
'तुम्ही जर नेहमी संताप आणि तक्रारी करत राहिलात तर लोकांसाठी तुमच्याकडे वेळ राहणार नाही.'   
'जे लोक म्हणतात की, 'सगळं काही नियतीनं आधीच निश्चित केलेलं असतं आणि ते बदलण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही' ते लोक देखील सडक ओलांडताना दोन्ही बाजूस पाहतात !'
'मी मृत्यूला घाबरत नाही पण मला मृत्यूची घाईही नाही. त्याची उकल करण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे.'
हॉकिंग यांची ही प्रसिद्ध अवतरणे खूप काही सांगतात.

त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
एका संघर्षमय विज्ञानपर्वाची अखेर झाली असली तरी त्यांचे जीवन अनंत काळासाठी जगाला प्रेरणादायी ठरेल.

- दस्तगीर सय्यद

Monday, 29 January 2018

६ वर्षे विणाअपघात सेवा

२९ जानेवारी २०१२ ला सुरू झालेला "  कुबूल है " चा गोड प्रवास आज ६ वर्षा पर्यंत आला .जग जरी तुला माझी पत्नी म्हणत असेल तरी एक मैत्रीण म्हणूनच आयुष्यात आली जिने माझ्या जीवनाच्या कक्षा रुंदावत नेल्या ज्युनियर सारखी अनमोल भेट दिलीस . खूप काही बदल अस कधीच काहीच केल नाहीस . उलट तूच माझ्याच स्वप्नात उतरत जाऊन समरस झालीस.
                      आयुष्य चढ उतार  , यश अपयश यांच्या मार्गाने नेहमीच चालत राहणार पण या सर्वात महत्वाचं  मनात अनेक स्वप्न बाळगून जिद्दीने वास्तवात उतरवली त्यामध्ये सहजिवनात साथ लाभली ती  म्हणजेच हिना तुझीच कौटुंबिक जबाबदा-या तिने समर्थपणे पार पाडल्याणेच मी इतर सर्व जबाबदार्या पेलण्यास समर्थ ठरलो. आज आमच्या वैवाहीक जीवनाचा सुखी संसाराचा ६ वर्षाचा प्रवास पुर्ण झाला अशीच कायम साथ राहील .
                    मनमौजी , भटक्या , माणसाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली स्थिरता मिळाली असं काहीसं म्हणता येईल . संसार असाच असतो काय समजत गेलं एकाने पसारा केला की दुसर्याने आवरायचा . मी पसाराच करत आलो आणि  तूच आवरत आलीस . आज पर्यंत खात्यावर चांगले मित्र आणि 'उत्कृष्ट' शत्रू  यांच्या बेरजा करतोय आणि  येणार्या प्रत्येक संकटाशी गुणाकार आणि भागाकार करून आयुष्यच  गणित सोडवतोय.
                    जेवढा नात्यांचा पाया खोल व मजबूत तेवढी तुमची पूर्ण झालेल्या संसाराची यशाची, स्वप्नांची, इमारत उंच . या ६  वर्षात आज पर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट काळ अनुभवण्याची संधी तू मिळवून दिलीस , म्हणून हा लिहण्याचा खटाटोप
#Happy_anniversary_lucky_charm
#शेख_मॅडम