बऱ्याच दिवसानंतर या रविवारी पुण्याला चाललो होतो , नेहमी प्रमाणे आपली सकाळीची ८ .४० ची दौंड बारामती पूणे पेसेंजर ने पण सकाळी उठायला उशीर झालाच , गाडी सापडते का नाही या विचारात निघालो केडगाव स्टेशन ला गाडी पार्किंग ला लावली तिकीट काढून , प्लॅटफॉर्म ला गेलो , तोच गाडी निघाली पळत सुटलो , गाडी धरली आणि सुटकेचा श्वास टाकला .
नेहमी प्रमाणे जागा करत विंडो सीट ला बसलो फॅन चालू होता , डोळे बंद केले जरा निवांत झालो डोळे उघडले समोर एक चित्र भल मोठ स्टिकर बघितलं ...
" रेहमत तेरी , मेहनत मेरी , हिम्मत हमारी , किसमत तुम्हारी "
असली चमत्कार पेहली बार ,घरबैठे फोन पर 11 घनटे में 101% लाभ
1. मनचाहा प्यार
2 . प्रेम विवाह
3. वशीकरण
4. गृहक्लेश
5. सास से छुटकारा
6 .पती को काबू में लाना
7. बंदिश बंधन खोलना
8. कोख में बाधा
9. करणी
10. मूठकरनी
11. रुठो को मनाना
दुःखी और परेशान भाई बेहनो के लिए भरोसेमंद ठिकाणा
*वशीकरण और करणी स्पेशालिटी*
*बाबा बंगाली *
( बुजूर्गो से मिला हुआ वरदान पल भर मे समाधान )
😂😂😂😂😂😂😂
तुरंत सम्पर्क करे ........
.... कालच रात्री दररोज या गाडी ने पुण्याला ये जा करनारा मित्र भेटला ,
म्हणाला , " मरता मरता वाचलो " , रेल्वेचा ब्रेकच नाही लागला ,
गाडी थांबली नाही स्टेशन वर , गाडी ने अचानक ट्रॅक बदलला गाडीने हेलकावे घेतले प्रचंड गोंधळ झाला सुदैवाने वाचले सगळे ..... मनात म्हणालो
( बाबा बंगालीची कृपा😉😉😉😉 )
No comments:
Post a Comment