Sunday, 30 July 2017

Atul khomne birthday

दौन्ड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रा मध्ये प्रभावी योगदान , देऊन आमच्या  " वरवंड " गावचे नाव ज्यांनी , क्रिकेट हॉलीबॉल , कॉर्फबॉल सारख्या खेळा मध्ये उंचावल , राष्ट्रीय खेळाडू म्हणून ख्याती मिळवलेले  
" अंकल " नावाने प्रसिद्ध असलेले.  .........

मा.श्री. " अतुल मारुती खोमणे " यांचा जन्मदिवस आपल्या मर्जी वर जगणारा , खेळ वर प्रेम करणारा , आणि नवोदित खेळाडू ना नेहमी प्रोत्साहन देणार एक दिलदार व्यक्तिमत्त्व
आज देखील ""साईराज स्पोर्ट "" च्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल करतोय .....

9 नंबर ची जर्सी घातलेला अतुल खेळताना बघायची मजाच यायची , बॉलिंग , फील्डिंग , बॅटिंग , टीम बरोबर च ताळमेळ , त्याचा फिटनेस , जसा काही तो मला ' ब्रायन लारा '  च भासायचा . अनेक रोमहर्षक सामने तो जिंकून द्यायचा ...  आज देखील तो खेळा साठी प्रोत्साहन देतो दरवर्षी क्रिकेट  स्पर्धा च यशस्वी आयोजन करतो .

मैदानाच्या खेळा वर तो एक यशस्वी खेळाडू ठरला ,, आज देखील आयुष्यात तो मैदान गाजवतोय , आणि यशस्वी वाटचाल करतो....
मला नेहमी खेळात प्रोत्साहन देणारा पण मला काही खेळायला जमायचं नाही तो आज ही आयुष्याच्या खेळात मला प्रोत्साहन देतो ....
आपण जगतो.. स्वप्न पाहतो.. कधी खचतो.. कधी उमेदीने उडी घेतो.. हरतो.. जिंकतो.. रडतो.. धडपड करतो.
आयुष्याशी खेळायला खूप बळ लागतं.. पाठीशी कुणीतरी खंबीरपणे असावं लागतं.. कुणीतरी समजवणार.. समजून घेणार.. चिंता करू नकोस सांगणार.. आधार देणारं.. आज माझ्या त्याच खंबीर आधाराचा वाढदिवस आहे
भावी वाटचालीस शुभेच्छा मित्रा 💐💐🎂🎂💐💐

#Happybirtday
#unkle
#Atul

Saturday, 29 July 2017

मी एक पुस्तक

एका पुस्तका सारखाच आहे मी ,
किती ही जुना झालो तरी
शब्द नाही बदलणार.....
कधी आठवण आलीच तर ....
पान उलटून बघ काल ही जसा होतो
आज ही तसाच आहे आणि उद्या ही असाच असेल ....

Wednesday, 26 July 2017

डॉ .अब्दुल कलाम पुण्यतिथी

" भारतरत्न , माजी राष्ट्रपती ,
मिसाईल मॅन , शास्त्रज्ञ  , लेखक , शिक्षक ,
करोडो लोकांचे आदर्श ,
2 वर्ष झाले शिलॉंग येथे विध्यर्थां ना मार्गदर्शन करत असताना भर सभेत कोसळले आणि प्राणज्योत मावळली.....
आज त्यांची पुण्यतिथी आज ही ते त्यांच्या चाहत्या मध्ये ते तसेच आहेत ...
""  ते म्हणायचे मला कुणी मी गेल्यानंतर आठवलं तर , ते एक शिक्षक म्हणून आठवावे ""( अग्निपंख )
संपत्ती , अहंकार , द्वेष ......कोसो लांब राहिलेला माणूस
आज प्रत्येकाच्या मनात मात्र घर करून गेला ,
स्वप्न पाहायला शिकवून गेला ,
विज्ञानाची ओढ लावून गेला ,
जगात भारताचा दबदबा निर्माण करून गेला ,

डॉ कलाम या सारखी लोक कधीच मरत च नाहीत
कलाम माणूस नव्हे तर एक विचारसरणी आहे
देशाशी असलेल प्रचंड देशप्रेम प्रगतीचा ध्यास असणारी ,

" विचार कधीच मरत नाहीत
ते नेहमीच अजरामर राहतात "
आज आपण सर्वजण त्यांचे विचार घेउन भारताला समृद्ध  करू हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ,
"The big success is started with big dream"

Real idol of my life
Miss u kalam sir 💐💐💐💐

#कलाम
#तुम्हे
#सलाम

Tuesday, 25 July 2017

आईला समजून घेताना उत्तम कांबळे

" आई समजून घेताना - उत्तम कांबळे "
काल रात्री हे पुस्तक वाचलं , पहिल्यांदा च एका रात्रीत कोणताही ब्रेक न घेता वाचलेलं हे पुस्तक उत्तम कांबळे एक उत्कृष्ट लेखक आज वर सकाळ च्या माध्यमातून येणारे लेख अनेकदा वाचले ,.
माझा मित्र Vaibhav Sarnot याच धन्यवाद त्याच्या मुळे आज आई समजून घेताना चा मी एक भाग बनलो
लेखक कांनी आई समजून घेताना , च्या माध्यमातून आई आणि मूल या नात्याला खरंच खूप वरच्या पातळी वर नेलं , आणि हे पुस्तक वाचणारा सुद्धा तिथं पर्यंत पोहचतो हेच खऱ्या अर्थाने याचं यश . ,...
अक्का ...एक दलित समाजातील अशिक्षित आडाणी बाई आणि तिने आयुष्य भर केलेला संघर्ष तो फक्त आणि फक्त आपल्या मुलां साठी प्रत्येक वाचकांना हे पुस्तक आपल्या आई कडे बघायचा एक नवीन च मार्ग दाखवतो
उत्तम घरात ज्वारी ; चोरून विकतो लाडू घेण्यासाठी त्यावेळी सुध्दा ती मुलाचीच बाजू घेते नवरर्याचा बेदम मार खाते ....पण आपल्या मुलाला कुणी चोर म्हणू नये म्हणून तिची तळमळ
स्वतः चोरून धान्य आणते .....पण मुलाला कधी कुणी चोर म्हणू नये असं एक आईच भाबड मन
संकटाच्या वेळी सुध्दा घराची जबाबदारी घेणारी आई
मुलींची लग्न , मुलाच्या शिक्षणात त्याला पैसे घेऊन 10 मैल चालत जाणारी आई  . ...
माझ्या वर खर्च करू नको तुझ्या लेकरांच बघ...
आपल्या चारही मुलांना प्रेम करणारी आई ....
प्रत्येकाचा विचार करणारी आई ..
घासातल घास देणारी आई .....
आई कधीच बदलत नाही ...मात्र ती बदलावी म्हणून असणारा मुलांचा एक मध्यमवर्गीय अट्टहास .....
का बदलावं तिने आपल्या खोट्या अहंकाराचा एक भाग म्हणून.....की या समाजासाठी या पांढरपेशी लोकांना एक दिखावा म्हणून ......
आई समजून घेताना ......ही प्रक्रिया अपूर्णच राहते

मी ही थोडा माझ्या आई ला समझुन घ्यायच्या प्रवासात हरवलो .....3 तासात डोळे पाणावून तिला पाहत होतो..

पहिल्या तीन मुली नंतर झालेलो मी ...माझ्या मावशीच्या सासूने श्री महंमद बाबा ना केलेला नवस ...म्हणून मला वयाच्या 11 व्या वर्षा पर्यंत मुंबई वरून मला यात्रेला घेऊन येणारी आई ....
7 वि पर्यंत स्वतः च्या हाताने अंघोळ घालणारी आई
माझ्या प्रत्येक शालेय कार्यक्रम पहिल्या रांगेत बसून बघणारी आई ...
सुट्टी ला गावाला आल्यावर पोहायला शिकवा माझ्या मुलाला म्हणून विहरीच्या वर बसून राहणारी आई ...
10 पर्यंत मला कोणत्याही सहलीला न पाठवणारी आई
12 वित अपघात झाल्यावर 3 महिने स्वतः च्या हाताने भरवणारी आनी सर्व करणारी आई ...
पुण्यात असताना दर रविवारी वडिलां कडे माझ्या आवडीचा डबा पाठवणारी आई ...
पेपर मध्ये आलेला फोटो सगळ्यांना दाखवणारी आई..
माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्याच बाजूने मला लढायला शिकवणारी आई
माझ्या लग्नात सर्वांचं मान सन्मान करणारी आई ..
मला मुलगा झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये आनंदाने पेढे वाटणारी आई...
आईला अटॅक आला होता .. बायपास साठी डॉक्टरांनी सांगितल्यावर एवढा खर्च करू नको म्हणून अंगावर आजार काढणारी आई ....
; पण तिची श्वासाची धाप ओळखनारा मी
( मी फक्त एवढाच समजू शकलो ती ला )
Operation यशस्वी झाल्यावर फक्त तुझ्या मूळे केलं अस सांगणारी आई ...नवऱ्याचं सुद्धा ऐकलं नसत
पोरा मुळे वाचली अस सगळ्यांना सांगणारी आई ...

आई ला समजू शकत नाही आपण पण मित्रानो आपन हा प्रयत्न नक्की करू शकतो आपल्या खोट्या प्रतिष्ठा आई वर लादू नाही शकत ती जशी आहे तशीच राहुद्या ....
उत्तम कांबळे सरां मुळे थोडा सा प्रयत्न सदैव सगळयांनी करावं , 
ही प्रक्रिया अशीच चालू द्या  ,
आई ला समझुन घेताना
बघा ती समझते का ??????
sayyadsir.blogspot.com

Sunday, 23 July 2017

Sufi Gazal .....nusrat saaab......mere rashke qamar



मेरे रशके कमर .......... ( तुझ्या सौन्दर्या वर चंद्र पण जळतो )
नसरत फतेह अली खान यांनी स्वरबद्ध केलेली ही गझल कवाली , शायर " फना बुलंद शेहरी " यांनी रचलेली शब्द रचना 1988 मध्ये पहिल्यांदा गायलेली ..…..
आजवर अनेक गायकांनी नवनवीन पध्दतीने साजरी केली , पण त्या शब्दातल्या खोली ला आज ही तितकाच मर्म आहे .........
                      सुफी , गझल आणि कवाली जेव्हा पासून आवडू आणि समझु लागल्या तेव्हा पासून " रशके कमर "
मनात घर च करुन बसली रोज रात्री ऐकताना त्या खोली मध्ये घेऊन चालली आहे रोज प्रेम वाढतच आहे आज पर्यंत चा  प्रत्येक प्रवास याच्या शिवाय झालाच नाही  अशी ही कलाकृती ........
प्रत्येक मिसरा एक तिची वेगळीच मजा

सर्वात आवडता मिसरा......

"" चांद के साये में ए मेरे साथिया तुने ऐसी पिलायी मजा आगया........
नशा शिशे में अंगडायी लेने लगा ...बजमे में रिंदा में सागर खनकने लगे .......
मजा आ गया .........
उसने शर मा के मेरी सवालात पे ऐसी गर्दन झुकाई मजा आगया आगया .... ....
( सुफी संगीत आवड असणाऱ्या साठी एक अभूतपूर्व ...... )