" आई समजून घेताना - उत्तम कांबळे "
काल रात्री हे पुस्तक वाचलं , पहिल्यांदा च एका रात्रीत कोणताही ब्रेक न घेता वाचलेलं हे पुस्तक उत्तम कांबळे एक उत्कृष्ट लेखक आज वर सकाळ च्या माध्यमातून येणारे लेख अनेकदा वाचले ,.
माझा मित्र Vaibhav Sarnot याच धन्यवाद त्याच्या मुळे आज आई समजून घेताना चा मी एक भाग बनलो
लेखक कांनी आई समजून घेताना , च्या माध्यमातून आई आणि मूल या नात्याला खरंच खूप वरच्या पातळी वर नेलं , आणि हे पुस्तक वाचणारा सुद्धा तिथं पर्यंत पोहचतो हेच खऱ्या अर्थाने याचं यश . ,...
अक्का ...एक दलित समाजातील अशिक्षित आडाणी बाई आणि तिने आयुष्य भर केलेला संघर्ष तो फक्त आणि फक्त आपल्या मुलां साठी प्रत्येक वाचकांना हे पुस्तक आपल्या आई कडे बघायचा एक नवीन च मार्ग दाखवतो
उत्तम घरात ज्वारी ; चोरून विकतो लाडू घेण्यासाठी त्यावेळी सुध्दा ती मुलाचीच बाजू घेते नवरर्याचा बेदम मार खाते ....पण आपल्या मुलाला कुणी चोर म्हणू नये म्हणून तिची तळमळ
स्वतः चोरून धान्य आणते .....पण मुलाला कधी कुणी चोर म्हणू नये असं एक आईच भाबड मन
संकटाच्या वेळी सुध्दा घराची जबाबदारी घेणारी आई
मुलींची लग्न , मुलाच्या शिक्षणात त्याला पैसे घेऊन 10 मैल चालत जाणारी आई . ...
माझ्या वर खर्च करू नको तुझ्या लेकरांच बघ...
आपल्या चारही मुलांना प्रेम करणारी आई ....
प्रत्येकाचा विचार करणारी आई ..
घासातल घास देणारी आई .....
आई कधीच बदलत नाही ...मात्र ती बदलावी म्हणून असणारा मुलांचा एक मध्यमवर्गीय अट्टहास .....
का बदलावं तिने आपल्या खोट्या अहंकाराचा एक भाग म्हणून.....की या समाजासाठी या पांढरपेशी लोकांना एक दिखावा म्हणून ......
आई समजून घेताना ......ही प्रक्रिया अपूर्णच राहते
मी ही थोडा माझ्या आई ला समझुन घ्यायच्या प्रवासात हरवलो .....3 तासात डोळे पाणावून तिला पाहत होतो..
पहिल्या तीन मुली नंतर झालेलो मी ...माझ्या मावशीच्या सासूने श्री महंमद बाबा ना केलेला नवस ...म्हणून मला वयाच्या 11 व्या वर्षा पर्यंत मुंबई वरून मला यात्रेला घेऊन येणारी आई ....
7 वि पर्यंत स्वतः च्या हाताने अंघोळ घालणारी आई
माझ्या प्रत्येक शालेय कार्यक्रम पहिल्या रांगेत बसून बघणारी आई ...
सुट्टी ला गावाला आल्यावर पोहायला शिकवा माझ्या मुलाला म्हणून विहरीच्या वर बसून राहणारी आई ...
10 पर्यंत मला कोणत्याही सहलीला न पाठवणारी आई
12 वित अपघात झाल्यावर 3 महिने स्वतः च्या हाताने भरवणारी आनी सर्व करणारी आई ...
पुण्यात असताना दर रविवारी वडिलां कडे माझ्या आवडीचा डबा पाठवणारी आई ...
पेपर मध्ये आलेला फोटो सगळ्यांना दाखवणारी आई..
माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्याच बाजूने मला लढायला शिकवणारी आई
माझ्या लग्नात सर्वांचं मान सन्मान करणारी आई ..
मला मुलगा झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये आनंदाने पेढे वाटणारी आई...
आईला अटॅक आला होता .. बायपास साठी डॉक्टरांनी सांगितल्यावर एवढा खर्च करू नको म्हणून अंगावर आजार काढणारी आई ....
; पण तिची श्वासाची धाप ओळखनारा मी
( मी फक्त एवढाच समजू शकलो ती ला )
Operation यशस्वी झाल्यावर फक्त तुझ्या मूळे केलं अस सांगणारी आई ...नवऱ्याचं सुद्धा ऐकलं नसत
पोरा मुळे वाचली अस सगळ्यांना सांगणारी आई ...
आई ला समजू शकत नाही आपण पण मित्रानो आपन हा प्रयत्न नक्की करू शकतो आपल्या खोट्या प्रतिष्ठा आई वर लादू नाही शकत ती जशी आहे तशीच राहुद्या ....
उत्तम कांबळे सरां मुळे थोडा सा प्रयत्न सदैव सगळयांनी करावं ,
ही प्रक्रिया अशीच चालू द्या ,
आई ला समझुन घेताना
बघा ती समझते का ??????
sayyadsir.blogspot.com
हे लेखक आईशी तेवढयाच आस्थेने वागतात का पण?
ReplyDelete