" कारण एकच राजकारण "
आज पर्यंत चा माझा सर्वात मोठा आणि सर्वात जास्त वैचारिकता जपणारा चर्चा करणारा हा ग्रुप , साधारण वर्षा भरा पूर्वी या मध्ये , सामील होण्याची संधी मिळाली ,
याचं ग्रुप च्या माध्यमातून एक मित्र भेटला
Facbook च्या आभासी दुनियेत ला एक मित्र .
माझ्या गावाच्या शेजारच्याच गावातील " पाटस " येथील , उद्योजक श्री संतोष टकले
ऑनलाईन बोलणे वेगळं , प्रत्यक्षात लवकर ओळखने वेगळं , पण अस झालं नाही .
आज दुपारी वेळ काढून भेटायला गेलो , आशीर्वाद ऑटोमोबाईल समोर गेलो दुकानात गर्दी होती , आणि मी " संतोष टकले " आहेत का हे विचारण्या अगोदरच , आतून आवाज आला , " या दस्तगीर भाई "
मी संतोष ला ओळ्खन्या अगोदरच माझी ओळख त्यांना पटली , आणि मी येणार आहे हे त्यांना माहीत नव्हतं तरी देखील .
एक ते दीड तास आम्ही गप्पा मारल्या , आणि त्या देखील खूप जुन्या मित्रा सारख्या , अनेक कौटुंबिक , आर्थिक , वयक्तिक अडचणी ना यशस्वी तोंड देऊन , हा वर आलेला एक समवयस्क मित्र , त्याच्या डोळ्यातच , त्याने काढलेले कष्ट , हरवलेलं आई वडिलांच छत्र , अडचणी , दिसत होत्या .
नोकरी सोडून , नवख्या व्यवसायात मध्ये येऊन केलेली दमदार कामगिरी आणि यशस्वी वाटचाल , कोणत्याही पाठिंबया शिवाय खूप प्रेरणा देऊन गेली .आपण नेहमी स्वतःच्या दुखाना गोंजारत बसतो , पण समाजात आज अशी लोक आहेत की आभाळा एवढ्या संकटाना सुद्धा जुमानत नाहीत आणि पुढे चालत राहतात ....
म्हणजेच " संतोष टकले "
अत्यंत जिद्दी , कष्टाळू , प्रेमळ आणि त्याच बरोबर सामाजिक जाण असलेलं बहुआयामी व्यक्तिमत्त्व
अजून खूप बोलायचं आहे बर का 👌👌
भावी वाटचालीस शुभेच्छा मित्रा
#thanks
#कारणएकचराजकारण
No comments:
Post a Comment