Sunday, 17 December 2017

कोल्हापूर रांगड्या दिलदार मातीचा

💐💐@@-कोल्हापूर दर्शन-@@💐💐

      या शैक्षणिक वर्षाची सहल यंदा दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातनाम असलेल्या कोल्हापूर दर्शन साठी गेली, अनेक वर्षांपासून ' कोल्हापूर ' च आकर्षण मनात   होत पावलापावलावर ऐतिहासिक खुणा जपणार , रांगड्या लोकांचं ,  लालमातीच मराठमोळं शहर हे  जिल्ह्याच ठिकाण आहे कोल्हापूर पण त्यात अजूनही ' गावपण ' खूपच छान जपल गेलंय.
अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा
' मयूरेश्वर ' ओळखला जातो.येथे दर्शन घेऊन कोल्हापूरच्या दिशेने  प्रवासाची सुरवात झाली .
                 सर्व प्रथम सज्जनगड किल्ला प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर ' सज्जनगड ' किल्ला वसलेला ३३५० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे . सातारा जिल्ह्यातील  डोंगररांगेतील हा किल्ला दुर्गप्रेमी च्या  दृष्टीने महत्वाचा समजला जातो. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले 'सज्जनगड'.
          ' चिन्मय गणाधिश ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपती मंदिराचे दर्शन घेतले काँक्रीट च्या साहायाने ८०फूट उंच आणि ८०० टन एवढी वजनाने  , जगातील सर्वात मोठी ठरेल अशी ही मूर्ती डोळ्याचे पारणं फिटेल अशीच होती.
        या नंतर कोल्हापूर शहरा कडे बस वळल्या , मुलांचे बस मधले धिंगाने जरा , कमी झाले आणि मूल या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहराला न्याहळत होती करवीर च्या  छत्रपती राणी ताराबाई ' चा अश्वारूढ पुतळा ऐतिहासिक वाडे ' दसरा चौक ' . शालिनी पॅलेस कोल्हापूर शहरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. हे महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले. रांगेत उभे राहून आमच्या चिमुकल्या जीवांनी दर्शन घेतली . संध्याकाळ झाली .
      नयनरम्य संध्याकाळी कोल्हापूर मध्ये रंकाळा बघणे म्हणजे काय ते फक्त त्यालाच कळेल ज्याने हे अनुभवलं सौदर्याने नटलेला ' रंकाळा ' सोबत आईसक्रीम , गोळा , भेळ भरपूर धमाल . मुलांना रंकाळा सोडून निघणे आवडलं नाही पण वेळ भरपूर झाली थकलेल्या पावलांना विसावण्यासाठी ठिकानाकडे न्यायचं होत . श्री महालक्ष्मी हॉलला मुक्कामी राहिलो .
          सकाळी ८ वाजता मुले तयार झाली .आणि दुसऱ्या दिवशी चा प्रवास सुरू झाला . करवीर ची राजधानी पन्हाळगडावर अभूतपूर्व असा हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशहा कडून जिंकला . पायथ्याशी एक सुंदर मस्जिद देखील  होती वळण घेत घेत बस चालल्या होत्या सुरवातीला ' शिवा काशीद ' यांचा पुतळा होता . हुबेहूब महाराजा सारखा ज्यानें महाराजांना वाचवन्या साठी प्रति शिवाजी म्हणून गेला  आणि प्राण गमवावे लागले.
         छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहारच्या वेढ्यातून विशाळगडावर सुरक्षित पोहोचण्याच्या आणीबाणीप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे,  यांनी पन्हाळगडावर सैन्याला थोपवून धरले ती पावनखिंड म्हणून ओळखली जाते आणि तो हा  पन्हाळगड, कोल्हापूरची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. पुसाटी बुरुज, तबक उद्यान, नायकिनीचा सज्जा, तीन दरवाजा, धान्य कोठार, अंबरखाना, धर्मकोठी, हिरकणी बुरूज, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय तसेच स्वामिनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आणि वीर शिवा काशिद यांची समाधी याठिकाणी आहे.
           दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्म शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे. दख्खनचा राजा चे दर्शन घेतले श्री.जोतिबा या धर्मस्थळामुळे कोल्हापूरचा लौकिक भारतभर झाला आहे .
यानंतर सर्वात शेवटच्या टप्प्यात आलो . तो म्हणजे
' शाहू पॅलेस ' वस्तुसंग्रहालय आणि प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९) महाराष्ट्राच्या  इतिहासातील धुरंधर राजकारणी , उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता , महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले , मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला .वेळ पुढे सरकत होती
संध्याकाळ झाली परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली ,मुलं गाडीत बसली  कोल्हापूर सोडावं अस वाटत नव्हतं मुलांना पण निघालो . परत येऊ म्हंटलो , अभिमान वाटला महाराष्ट्राच्या भूमीचा✌
                    👑  * जय महाराष्ट्र * 👑

No comments:

Post a Comment